गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा परिसरात रानटी हत्तीच्या हल्ल्यात एका सायकलस्वार युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव धनराज मनीराम मडावी (वय 37 वर्षे) असे आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धनराज मडावी हे सायकलने मेंढा येथून चांदाळा गावाकडे जात असताना वाटेत रानटी हत्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी जंगलालगतच्या भागात ये-जा करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
