
बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. बीडच्या माजलगाव येथे सावकारी परवाना देण्यासाठी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर 13 हजार रुपये स्वीकारताना सहायक निबंधक कार्यालयीन अधीक्षक आणि खाजगी व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले. माजलगाव येथील सहायक निबंधक कार्यालयात हा ट्रॅप करण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
माजलगाव येथील सहाय्यक निबंधक, कार्यालयात सावकारीचा परवाना (लायसन्स) मंजूर करून देण्यासाठी पंधरा हजार रुपयाची मागणी करून 13 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे आणि सहकार अधिकारी (श्रेणी-२) सतीश शेरखाने व खाजगी इसम महेश फपाळ यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले केले. या कारवाईमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
