मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
स्थानिक सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे तान्हा पोळ्याचे औचित्य साधून नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पूर्व प्राथमिक ते वर्ग ८ वी पर्यंतच्या तब्बल ४८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
मान्यवरांची उपस्थिती:
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नरसिंगभाऊ गणवेनवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक श्री राहुल प्रेमलवार, नगरसेवक श्री ऋतिक गोयल, सौ. डिंपी गोयल, श्री डेव्हिड खोब्रागडे, प्रा. मारोतराव पुल्लावार, श्री गणेश मांडवकर, सौ. उषाताई शेंडे, सौ. लीनाताई बद्देलवार, श्री मिलिंद खोब्रागडे, श्री विजय वैरागडवार, मारोडा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मोगरकर सर, मुख्याध्यापक श्री अविनाश जगताप, सौ. सुवर्णाताई पिपरे, सौ. इंदुताई मडावी, सौ. गायत्री मडावी, सौ. उषाताई थोराक, श्री नरेंद्र कामडे, श्री अमोल बोबाटे व सौ. गीता अमदुर्तीवार कल्याणी मांदाडे, माधुरी चिंचोलकर चावके, मुनघाटे, इटनकर ,यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच पत्रकार बंधू सर्वश्री दीपक देशपांडे, नासीर खान, कुमुदिनी भोयर, दुर्योधन घोंगडे, आनंदराव कुडे, दत्तू वारानसीवार, धर्मा सुत्रपवार आणि सौ. वैशाली कोपुलवार यांसह इतर मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे स्वरूप व बक्षीस वितरण:
ही स्पर्धा एकूण तीन गटांत आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तसेच सहभागी झालेल्या सर्व ४८ विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
सूत्रसंचालन व आभार:
कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन कु. रिना मसराम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री राजू गेडाम यांनी मानले.
आयोजन व यशस्विता:
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री राहुल मुंगमोडे, श्री योगेश पुल्लकवार, श्री बंडू अल्लीवार, श्री अजय राऊत, श्री संकेत जाधव व सौ. निशा जगताप सौ .फलके, मोकाशी, पोहणे,यांनी परिश्रम घेऊन विशेष पुढाकार घेतला.
