मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
आदिवासी समाजाचे महानायक, थोर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी मूल शहराच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचे स्मरण केले. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा भारतीय इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांतून आदिवासी समाजामध्ये एकता, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा निर्माण केली. त्यांचे योगदान आणि देशासाठी केलेला त्याग भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.
यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला. भारतीय जनता पार्टी मूल शहराच्या वतीने त्यांच्या त्याग, संघर्ष आणि देशभक्तीला विनम्र अभिवादन करण्यात आले.
