जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल यांच्या सूचनेनुसार आयोजन; नगरसेवक अतुल गोवर्धन यांच्या हस्ते झेंडावंदन
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
श्री. सचिन कत्याल, जिल्हाध्यक्ष, सेवादल यांच्या सूचनेनुसार रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.०५ वाजता काँग्रेस भवन, मूल येथे मासिक झेंडावंदन कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगर परिषद मूलचे नगरसेवक श्री. अतुल गोवर्धन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ सेवादल कार्यकर्ते गंगाधर घुगरे, नगरसेवक विवेक मुत्यलवार, गणेश मेश्राम, पवन नीलमवार, पंकज पुल्लावार, मिथुन पटवा यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते.
या मासिक झेंडावंदन कार्यक्रमाचे आयोजन नवनियुक्त सेवादल तालुका अध्यक्ष मंगेश बत्तूलवार यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. मासिक झेंडावंदनाच्या माध्यमातून काँग्रेस सेवादलाची संघटनात्मक बांधिलकी आणि एकजूट अधोरेखित झाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
