आर्थिक व्यवहार व भ्रस्ट्राचार केल्या प्रकरनी कारवाई
नागपुर : ब्यूरो चीफ मंगेश उराडे
नागपूर जिल्हयातील टाकळघाट ही सर्वात मोठी व सर्वात जास्त उत्पन्न असलेली ग्रामपंचायत आहे या ग्राम पंचायत टाकळघाट ची सरपंच शारदा शिंगारे हीला आर्थिक व्यवहार केलेल्या घोटाळ्याचा ठपका ठेवत अपात्र ठरविण्यात आले. ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेला अनन्यसाधारण महत्त्व असताना टाकळघाट ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहारांवरून निर्माण झालेल्या वादाला अखेर प्रशासकीय आदेशाचा कडवा अध्याय लाभला आहे. ग्रामपंचायतीच्या निधीच्या वापरात नियमांचे उल्लंघन, मजुरीचे रोखीने वाटप तसेच विविध आर्थिक व्यवहारांबाबत झालेल्या तक्रारीची सुनावणी घेतल्यानंतर अपर विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपुर यांनी तक्रार अर्ज मान्य करत सरपंच शारदा ज्ञानेश्वर शिंगारे हीला ग्रामपंचायत टाकळघाटच्या सदस्य व सरपंचपदासाठी अपात्र घोषित केलेले आहे. हा आदेश २१ सप्टेंबर रोजी पारित करण्यात आला.
टाकळघाट ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री.उमेश नथ्युजी कावळे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये ग्रामपंचायत निधीतील आर्थिक व्यवहार, मजुरांना करण्यात आलेले रोख स्वरूपातील भुगतान, विकासकामांशी संबंधित देयके तसेच शासनाच्या आर्थिक नियमांचे पालन झाले नसल्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. प्रकरणाच्या चौकशीत विविध बाबींचा सखोल विचार करण्यात आला.
चौकशीदरम्यान विविध विकासकामांवर काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्याऐवजी रोखीने मजुरी देण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून मजुरी थेट बँक खात्यात अदा करण्याबाबत निर्देश असतानाही रोखीने व्यवहार करण्यात आल्याने या बाबीकडे गंभीरपणे पाहण्यात आले. तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीतील मजुरीची रक्कम
प्रत्यक्ष मजुरांच्या नावाऐवजी निविदाधारकाच्या नावाने अदा झाल्याची बाबही आदेशातील विवेचनात नमूद आहे.
पारदर्शकतेची जाणीव करुन देणारा ठरला निर्णय
दरम्यान, संबंधित सरपंचांनी आपल्या बचावात अनेक आर्थिक व्यवहार ग्रामपंचायत ठरावानुसार झाल्याचे, मजुरांना प्रत्यक्ष कामाच्या आधारे मजुरी देण्यात आल्याचे आणि ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाले नसल्याचे नमूद केले होते. मात्र, उपलब्ध अभिलेख, चौकशी अहवाल आणि संबंधित नियमांचा विचार करून न्यायासनाने तक्रार अर्ज मान्य केला.
या आदेशामुळे टाकळघाट ग्रामपंचायतीच्या कारभारात खळबळ उडाली असून, ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये नियम, पारदर्शकता आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे, याची जाणीव करून देणारा हा निर्णय ठरला आहे.
ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सरपंच व सचिव यांची संयुक्त जबाबदारी असतांना सरपंच व सचिव यांनी संगनमत करून लाखो रुपयाचा अपहार केला असून, ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर, आर्थिक अभिलेखांची देखभाल आणि शासनाच्या योजनांचा निधी नियमानुसार खर्च होतो आहे की नाही, याची दक्षता घेणे ही संबंधितांची जबाबदारी असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांनी सादर केलेल्या
चौकशी अहवालाशी अपर विभागीय आयुक्तांचे न्यायासन सहमत झाले. त्यानंतर तक्रार अर्ज मान्य करून टाकळघाट ग्रामपंचायतच्या सरपंचा शारदा ज्ञानेश्वर शिंगारे यांना पुढील कालावधीसाठी ग्रामपंचायत टाकळघाट येथील सदस्य व सरपंचपद धारण करण्यास अपात्र घोषित करण्यात आले.व तसेच ग्रामपंचायत सचिवाविरुद्ध प्रशासकीय बाबींमध्ये नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांना देण्यात आले आहेत.
