मुल : रवींद्र बर्डे (तालुका प्रतिनिधी)
मूल येथे कारगिल विजय दिवस माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था तथा भरारी महिला बचत गट यांच्या कडून कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
सर्वप्रथम मूल मधील गुजरी चौकातील अशोक स्तंभाला नगराध्यक्ष एकता समर्थ यांच्या हस्ते पुष्प चक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर मूल चे पोलीस पथक यांचे सह एन सी सी चे विध्यार्थी पथ संचालन करून गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मालर्पण करून माजी सैनिक बहुउद्देशीय संघटना च्या कार्यालयात माजी सैनिक मारोतराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर हुतात्मा स्मारकाजवळ पुष्पचक्र अर्पण करून मा दुर्गा सभागृहात कारगिल विजय दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला मूल च्या नगराध्यक्ष एकता ताई समर्थ अध्यक्ष म्हणून होते तर माजी सैनिक मारुती कोकाटे माजी सैनिक सहदेव रामटेके एकनाथराव गडेकर बाबासुर विलासराव पुलकवार सातपुते मेश्राम आधी सैनिक उपस्थित होते
यावेळी माजी सैनिकांनी कारगिल विजय मध्ये त्यांच्या सहभागातील किसे विद्यार्थ्यांना सांगितले नगराध्यक्ष एकताताई समर्थ यांनी विद्यार्थ्यांना चांगलं शिकन देशसेवा करण्यासाठी प्रोत्साहित केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासुर यांनी केले तर आभार प्रदर्शन भासारकर मॅडम यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता माजी सैनिक संघटना चे सर्व माजी सैनिक तथा अग्नीवीर व भरारी महिला बचत गटाच्या महिलांनी केलं
शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली
