पुरुष व महिला गटातील खेळाडूंना मिळणार कौशल्य दाखविण्याची संधी; लाखोंची बक्षिसे आकर्षण
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
स्वराज्य क्रीडा मंडळ, मूल व शिवानीताई संदीप आगडे मित्र परिवार, मूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय आकाशभाऊ गुरनुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बाजार चौक, सोमनाथ रोड, मूल येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत पुरुष व महिला अशा दोन्ही गटांतील संघांना सहभागी होण्याची संधी मिळणार असून शहरी व ग्रामीण अशा दोन्ही विभागांतील खेळाडू आपले कबड्डी कौशल्य दाखविणार आहेत. विशेष म्हणजे स्पर्धेत अटीतटीचे सामने आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.
पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक २० हजार १ रुपये, तर द्वितीय पारितोषिक १५ हजार १ रुपये ठेवण्यात आले आहे. महिला गटासाठी प्रथम पारितोषिक १० हजार १ रुपये, तर द्वितीय पारितोषिक ७ हजार १ रुपये जाहीर करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील कबड्डीपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अभय (७९७२११५५०४), उत्कर्ष (९८३४९५७८४८) व उज्ज्वल (७०५७४८०५७१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेला मूल नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. अश्विनीताई रुपेश निकोडे यांचे सौजन्य लाभले आहे. परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
