मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
वाढदिवस म्हटले की मोठमोठे बॅनर, डीजे आणि जल्लोष असे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, या परंपरेला फाटा देत मूल नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका अश्विनीताई रुपेश निकोडे यांनी समाजहिताचा आदर्श निर्णय घेतला आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा न करता बॅनरबाजी आणि अनावश्यक खर्च टाळून, राज्यातील दुष्काळग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
या मदतीचा धनादेश राज्याचे माजी मंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सुपूर्द केले.
संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा अश्विनीताई निकोडे यांचा हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे. वाढदिवसाचा खर्च स्वतःच्या आनंदासाठी न करता गरजूंच्या मदतीसाठी वापरण्याची त्यांची भूमिका इतर लोकप्रतिनिधींसाठीही प्रेरणादायी आहे.
याबाबत आपली भावना व्यक्त करताना अश्विनीताई म्हणाल्या,
“माझा वाढदिवस हा माझ्यासाठी नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे. शेतकरी जगला तरच आपण जगू. त्यामुळे बॅनरबाजीपेक्षा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे मला अधिक महत्त्वाचे वाटते.”
या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या अश्विनीताई निकोडे यांच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. यावेळी रुपेश निकोडे व मित्रपरिवार उपस्थित होते.
