गुलशन कुमार म्युझिकल ग्रुप गोंदिया यांची भक्तिमय प्रस्तुती
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल येथील राजमाता माँ परमेश्वरी दुर्गा मंडळाच्या वतीने सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य देवी जागरणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गुलशन कुमार म्युझिकल ग्रुप, गोंदिया यांच्यातर्फे देवीच्या भक्तिगीतांची विशेष प्रस्तुती होणार आहे.
हा भक्तिमय कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता मूल येथील गुजरी चौक परिसरात, फडणवीस वाड्याच्या समोर आयोजित करण्यात आला आहे. देवीच्या भक्तिगीतांनी परिसर भक्तिमय होणार असून, भाविकांना माता राणीच्या आराधनेचा आनंद घेता येणार आहे.
या देवी जागरण कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
