मुंबई : विशेष प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टायगर श्रॉफ याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या हाताला दुखापत झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, हल्लेखोर कोण होते आणि अभिनेता सुरक्षित असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या अधिकृत माहिती नंतर घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
