मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
स्व. चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समिती, मूल यांच्या वतीने आयोजित भव्य गरबा महोत्सव २०२६ ला सुरुवात झाली असून, या महोत्सवात रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
मूल येथील तालुका क्रीडा संकुलात ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या उत्साहात रंगणाऱ्या या महोत्सवात गरबाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांना संधी उपलब्ध झाली आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या उपस्थितीमुळे आजच्या कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभणार आहे. त्यामुळे मूल शहरासह परिसरातील नागरिक, गरबाप्रेमी आणि तरुणाईमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपत नागरिकांना मनोरंजनाची पर्वणी मिळत आहे. या भव्य गरबा महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
